कृषी संजीवनी मोहिमेच्या अनुषंगाने वेताळबांबर्डे आईनमळा येथे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

53

कुडाळ (प्रतिनिधी) २१ जून २०२४

कृषी संजीवनी मोहिमेच्या अनुषंगाने वेताळबांबर्डे आईनमळा येथे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय कुडाळ अंतर्गत कृषी संजीवनी मोहिमेच्या अनुषंगाने वेताळबांबर्डे आईनमळा येथे गुणवत्तापूर्ण निविष्ठांची ओळख याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कुडाळ तालुका मंडल कृषी अधिकारी व्ही. जे. घोंगे आणि कृषी सहाय्यक श्रीम. एस. व्ही. हरमलकर यांनी मार्गदर्शन केले. ही मोहीम १७ जून ते १ जुलै पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्याच वेळी वेताळबांबर्डे येथील माऊली कृषी सेवा केंद्र संचालिका श्रीम. पूजा पाटकर ह्यांनी विविध कृषी निविष्ठांविषयी माहिती दिली. यावेळी अधिकार्‍यांनी गुणवत्ता निविष्ठांची ओळख, त्यांची निवड कशी करावी, त्यांचा योग्य वापर कसा करावा तसेच जमिनीचा नमुना घेताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या, मातीमधिल पोषक अन्न द्रव्यांच्या उपलब्धतेनुसार खते कशी निवडावी व त्यांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे त्यासोबत बियाणांच्या उगवन क्षमतेचे परिक्षण कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या मोहिमेंतर्गत कृषी पर्यवेक्षक श्री. अनसुरकर यांनी पीक विमा योजनेचे मार्गदर्शन केले. ह्या पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या मोहिमेदरम्यान ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत वेताळबांबर्डे येथे स्थित असलेल्या उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील कृषी कन्या सिद्धी परब अवंतिका काळे पल्लवी भामरे फाल्गुनी प्रभू राजलक्ष्मी केसरकर यांनी सहभाग घेतला. या कृषी कन्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महाविद्यालयामार्फत प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. त्या प्रात्यक्षिकांना गावातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे विनंती कृषीकन्यांनी केली. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री. अशोक घोगळे रूपेश घोगळे जयवंत गावडे संज्योत सावंत सखाराम गावडे सुहास गावडे यांचे सहकार्य लाभले.