तळवडे येथील  जिल्हास्तरीय ( सोलो ) रेकार्ड डान्स स्पर्धेत लहान गटात निधी खडपकर प्रथम तर मोठया गटात मृणाल सावंत प्रथम

201

देवगड (स्वप्निल लोके) 16 मे 2024

तळवडे येथील  जिल्हास्तरीय ( सोलो ) रेकार्ड डान्स स्पर्धेत लहान गटात निधी खडपकर प्रथम तर मोठया गटात मृणाल सावंत प्रथम

 

तळवडे खालची धुरीवाडी श्री निम्बेश्वर सटवी देवस्थान येथे श्री . सत्यनारायण महापुजेनिमित्त भव्य जिल्हास्तरीय ( सोलो ) रेकार्ड डान्स स्पर्धा संपन्न झाली या स्पधेत जिल्हातील २५ हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .
तळवडे ( देवगड ) खालची धुरीवाडी आयोजित या रेकार्ड डान्स स्पधेत लहान गट १३ वर्षाखालील प्रथम क्रमाक निधी खडपकर ५०००/- व आकर्षक चषकाचा मानकरी ठरली तर , द्वितीय क्रमांक साईशा नरेंद्र धुरी ३००० / – व आकर्षक चषकाचा मानकरी ठरली, तर तृतीय क्रमांक सांची योगेश बाने २०००/ -व आकर्षक चषकाची मानकरी ठरली .
तर मोठा गट १३ वर्षावरील प्रथम क्रमाक मृणाल सावंत ८०००/-व आकर्षक चषकाची मानकरी ठरली तर द्वितीय क्रमांक अनुष्का कांदळगावकर ४००० /-व आकर्षक चषकाची मानकरी ठरली , तर तृतीय क्रमांक सिद्धी समिर धुरी २०००/-व आकर्षक चषकाची मानकरी ठरली .विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारीतोषिके देऊन गौरवण्यात आले .
या स्पधेसाठी परीक्षक म्हणून सुप्रिया ढोके व आकाश सकपाळ यांनी काम पाहिले.
दुपारच्या सत्रात गावातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी फनी गेम्स स्पधेचे आयोजन करण्यात आले . यामध्ये प्रथम क्रमांक शिवन्या नरेंद्र धुरी, द्वीतीय क्रमांक सृष्टी स्वप्निल धुरी , तृतीय क्रमांक सरिता अरूण धुरी यांनी पटकावला
या स्पधेसाठी प्रमुख मान्यवर म्हणून तळवडे सरपंच गोपाळ रुमडे, उपसरपंच भाग्यश्री धुरी, ऋत्विक धुरी उपस्थित होते .
या स्पधेचे सुत्रसंचालन व आभार प्रसाद दुखंडे यांनी मानले .