देवगड( प्रतिनिधी) १६ मे २०२४
युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मे नारीग्रे व १९ मे मुणगे येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देवगड युवासेना तालुका प्रमुख गणेश जगदीश गांवकर यांच्या १८ मे रोजी वाढदिवसानिमित्त १७ मे रोजी नारिंग्रे व १९ मे रोजी मुणगे या दोन गावात नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१७ मे २०१४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नारिंग्रे येथील लवू दळवी यांचे निवासस्थानी नॅब नेत्र रूग्णालय देवगड मेडिकल फाऊडेशन डॉ आठवले यांच्या सहकार्यातून नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर तर १९ मे २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत बी.के.एल. वालावलकर रुग्णालय डेरवण, चिपळूण व नॅब नेत्र रूग्णालय देवगड मेडिकल फाऊडेशन डॉ आठवले यांच्या सहकार्यातून मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर श्री भगवती एज्युकेशन सोसायटी स्व. वीणा सुरेश बांदेकर ज्युनियर कॉलेज मुणगे येथे आयोजित करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी श्रीकांत गावकर नारिग्रे व प्रमोद वळंजू मुणगे यांच्याशी संपर्क साधावा.





