नगरपंचायत की डम्पिंग ग्राउंड ; नगरपंचायत झाली पण देवगडच्या कचऱ्याचा प्रश्न सुटता सुटेना , कचरा प्रश्र्नी दोन्ही टर्मच्या सत्ताधाऱ्यांचे आले नाकी नऊ

171

नगरपंचायत की डम्पिंग ग्राउंड ; नगरपंचायत झाली पण देवगडच्या कचऱ्याचा प्रश्न सुटता सुटेना , कचरा प्रश्र्नी दोन्ही टर्मच्या सत्ताधाऱ्यांचे आले नाकी नऊ

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

देवगड (प्रतिनिधी) ११ मे २०२४

देवगड जामसंडे हे शहर कातळावर वसले असल्याने या शहरात पिण्याच्या पाण्याची खूप गंभीर समस्या आहे. देवगड आणि जामसंडे ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली की पाण्याच्या प्रश्न सुटेल असे त्यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे चातकासारखी ग्रामपंचायतची नगरपंचायत होण्यासाठी देवगड जामसंडेवासीय वाट पाहत होते. देवगड जामसंडे नगरपंचायत झाली आणि आता पाण्याचा प्रश्न लवकरच सुटेल या आशेने देवगड जामसंडे वाशीयांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र नगरपंचायत हीच खरी मोठी पंचायत झाली.असे आता शहरवासीयांना वाटू लागले आहे नगरपंचायत झाल्याने बरेच बदल झाले मात्र या शहरात कर वसुली व्यतिरिक्त कुठलीही नागरी सुविधा येथील नागरिकांना मिळत नसल्याने आता हीच शहरातील जनता आमची ग्रामपंचायत बरी होती असे म्हणत आहे.

देवगड जामसंडे नगरपंचायत होऊन सात वर्षे होत आली मात्र पाण्याचा प्रश्न सुटला नाहीच ,उलट देवगड जामसंडे शहराचा कचरा प्रश्न हा आक्रमक बनला आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या व दोन टर्मच्या सत्याधारांच्या देवगड जामसंडे शहराचा कचरा प्रश्न सोडविताना अक्षरशः नाकीनऊ आल्याचे दिसत आहे. नगरपंचायत झाल्याने दोन्ही शहराचा कचरा एकत्र करून देवगड पवनचक्की येथील खडकात ,तर
पिण्याच्या पाण्याच्या टाकीखाली , चक्क नगरपंचायतीने कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड बनवल्याने त्यावेळचे विरोधात असलेल्या शिवसेना पक्षाने आंदोलन करत आवाज उठवत नगरपंचायत प्रशासनाचा कचरा तिथून उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर कट्टा येथील दोन्ही ठिकाणच्या बागायतदारांच्या परवानगीनुसार कचरा त्यांच्या खाजगी बागेत टाकण्यात आला होता. त्यावेळच्या प्रशासनाने व सत्ताधारी यांनी उपलब्ध केलेली कचरा डम्पिंग ग्राउंड साठी टेंबवली येथे जागा घेतली होती. मात्र या जागेत कचरा डम्पिंग ग्राउंड करण्यास तेथील स्थानिक लोकांचा मोठ्या प्रमाणात विरोध असल्याने येथे डम्पिंग ग्राउंड होऊ शकले नाही. पाच वर्षाचा कालावधीनंतर नगरपंचायत मध्ये सत्ता बदल झाला व नगरपंचायत शिवसेना (महाविकास आघाडी) च्या ताब्यात आली. मात्र शहराचा कचऱ्याचा प्रश्न सुटण्याऐवजी तो उलट वाढत गेला .आता तर कचरा प्रश्नाचा कहरच झाला. नगरपंचायतीचे डम्पिंग ग्राउंड नसल्याने हा कचरा चक्क देवगड जामसंडे नगरपंचायत परिसरातच डम्पिंग केला जात आहे. त्यामुळे नगरपंचायत आहे की डम्पिंग ग्राउंड हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

oplus_2


नगरपंचायत परिसरातच कचरा टाकल्याने कचऱ्याचा प्रश्न झाला गंभीर असून प्रशासनासह सत्ताधारी नगरसेवकांचेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. नगरपंचायत प्रशासनाच्या कामकाजाबद्दल ताशेरे ओढले जात आहेत.

डम्पिंग ग्राउंड साठी जागा उपलब्ध नसल्याने दोन दिवसासाठी हा कचरा नगरपंचायत परिसरात ठेवण्यात आला मात्र आज महिना उलटून गेला तरी तो नगरपंचायत परिसरातच आहे. नियमित जमा केलेला कचरा डम्पिंग केल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. शिवाय याच ठिकाणी रस्त दराचे धान्य दुकानही आहे त्यामुळे या दुकानात जाणाऱ्या सर्वसाधारण नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. नगरपंचायत परिसरातच कचरा डम्पिंग होत असल्याने नगरपंचायत परिसरात गुरांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.

त्यामुळे नगरपंचायत हे प्रशासकीय कार्यालय आहे की गुरांचा गोठा हे प्रशासनाने पहाणे देखील तितकं महत्त्वाचं आहे. नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ या कचऱ्याची विल्हेवाट लावावी व परिसरात होणारी दुर्गंधी रोखावी. हवामान खात्याने आदेश दिल्यानुसार जर पावसाला सुरुवात झाली तर या डंपिंग केलेल्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी, साथीचे आजार रोगराई पसरू शकते. यामुळे नगरपंचायतीने याकडे तात्काळ लक्ष केंद्रित करावे अशी मागणी शहरवासीयांमधून होताना दिसत आहे