इन्सुलीत अडीच लाखांची दारू जप्त एक ताब्यात

11

इन्सुलीत अडीच लाखांची दारू जप्त एक ताब्यात

बांदा (प्रतिनिधी) दिनांक ४ मे २०२४

 
गोवा बेकायदा बनावटीची दारू गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने चौकुळ येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन लाख 58 हजार रुपये किमतीच्या दारूसह, मोटार असा सात लाख 58 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. बांदा सावंतवाडी मार्गावर इनसुली इथं दारू फॅक्टरी च्या परिसरात ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली. गोपाळ सुरेश गावडे (वय 36 रा. नेनेवाडी चौकुळ) असे संशयीताचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीची बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येते आहे. सावंतवाडी मार्गावर इन्सुलिन येथील एका कंपनीजवळ वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट मोटारीला (एम. एच. 07 Q 86 85) तपासणीसाठी थांबवले. मोटारीच्या मागील डिकीत आणि सीटवर गोवा बनावटीच्या दारूचे बेकायदा खोके आढळले. पथकाने गोवा बनावटीच्या दारूचे 2 लाख 58 हजार रुपये किमतीचे बेकायदा 45 कागदी पुठ्ठ्यांचे खोके 900 सील बंद बाटल्या जप्त केल्या. तसेच 5 लाख रुपये किमतीची मोटार देखील ताब्यात घेतली.

चालकावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, तानाजी पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, रणजीत शिंदे, दीपक वायदंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास तानाजी पाटील करत आहेत.