बिबवणेत श्री गजानन महाराज ध्यान मंदिराचा १२ वा प्रकट दीन व दत्तात्रय सोहळ्यास प्रारंभ…!

कुडाळ : बिबवणे – पळसेवाडी येथील श्री गजानन महाराज ध्यान मंदिराचा बारावा प्रकट दीन व दत्तात्रय सोहळा 5 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या उत्सव कालावधीत जिल्हास्तरीय भजन स्पर्धेसह धार्मिक व अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

5 फेब्रुवारी सकाळी 8 वाजता गजानन महाराज पादुकावर दुग्धाभिषेक, 9 वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वाजता महाआरती व महानैवेद्य, सायंकाळी 4 वाजता स्वामींच्या निर्गुण पादुकांचे सवाद्य शेगावी प्रस्थान, 5 वाजता अष्टविनायक महिला भजन मंडळ ( साळेल ) बुवा अंकिता गावडे यांचे भजन, 7 वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धा उद्घाटन, प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण, मानव अधिकार विभागाचे सचिव अमित वेंगुर्लेकर ,जिल्हा आयुष्य अधिकारी कृपा गावडे, जिल्हाधिकारी सामान्य प्रशासन अधिकारी अशोक पोळ आदी उपस्थित होते.

6 रोजी सकाळी 8 वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी 4 वाजता रामकृष्ण मंडळ ( कसाल ) यांचे भजन, 7.30 वाजता नियमित भजन स्पर्धा.

7 रोजी सकाळी 8 वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी 4 वाजता मंगलमूर्ती मंडळ (निरवडे ) यांचे भजन, 7.30 वाजता नियमित भजन स्पर्धा.

8 रोजी सकाळी 8 वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी 12 वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळीं 4 वाजता कीर्तनकार अरुण सावंत (वेंगुर्ले ) यांचे कीर्तन, 7.30 वाजता नियमित भजन स्पर्धा.

9 रोजी सकाळी 8 वाजता सत्यनारायण महापूजा, 11 वाजता श्री ची पालखी प्रदक्षिणा (श्री देव गिरोबा मंदिर ते श्री गजानन महाराज मंदिरापर्यंत ), रात्री 8 वाजता श्री देव रवळनाथ पावणाई मंडळ ( कुंदे ) यांचा हरिपाठ, 10 वाजता समर्थ मंडळ ( कट्टा ) बुवा आनंद आचरेकर यांचे भजन.

10 रोजी सकाळी वाजता गजानन महाराज पोथी पारायण व सामुहिक नामस्मरण, दुपारी 12 वाजता आरती व महाप्रसाद, 3 वाजता विठ्ठल रखुमाई मंडळ ( धामापूर ,चंदगड ) यांचे भजन, सायंकाळी 6.30 वाजता सद्गुरू मंडळ (कुडाळ ) बुवा वैभव सावंत यांचे भजन, रात्री 8 वाजता कीर्तनकार महेश भादवडकर महाराज (आजरा – कोल्हापूर ) यांचे कीर्तन.

11 रोजी सकाळी 8 वाजता दत्तयाग प्रारंभ, दुपारी 1 वाजता आरती व महाप्रसाद, 3 वाजता हळदीकुंकू व फुगडी ,सायंकाळी 6.30 वाजता संत बाळूमामा प्रतिष्ठान मंडळ ( सरंबळ ) यांचे भजन, रात्री 9 वाजता ज्ञानदेव तुकाराम वारकरी सेवा मंडळ ( नेमळे ) यांचा हरिपाठ, 11 वाजता श्रीदेवी जय भवानी ( हुमरमळा – अणाव ) यांचा गोंधळ, 12 रोजी सकाळी 9 वाजता दत्तयाग, दुपारी 1 वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी 4 वाजता श्री क्षेत्र मळगाव विठ्ठल रखुमाई गोपाळ बोध स्वामी पालखी सोहळा, 5 वाजता श्री देवी यक्षिणी शिक्षक मित्र मंडळ मंडळ ( माणगाव ) यांचे भजन, 7 वाजता कीर्तनकार भगवानदास कोकरे महाराज (चिपळूण ) यांचे कीर्तन, रात्री 9 30 वाजता श्री रामेश्वर मंडळ (कुडाळ) बुवा अनिल पांचाळ यांचे भजन.

13 रोजी प्रकट दिन सोहळा : सकाळी 6 वाजता श्री दत्त पूजा, दत्तयाग समाप्ती, स्वामींच्या मूर्तीवर लघु रुद्राभिषेक, दुपारी 1 वाजता आरती व महाप्रसाद, 3 वाजता श्री लक्ष्मी, शिव भजन मंडळ ( कानूर, गडहिंग्लज – कोल्हापूर ) यांचे सोंगी भजन, रात्री 8 वाजता इंद्रधनु कलामंच ( दाभोली – वेंगुर्ले ) निर्मित चला आळंदीला नाटक.

14 रोजी सकाळी 9 वाजता श्री देव रामपंचायतन अभिषेक, 10 वाजता मुलांचे विविध स्पर्धात्मक कार्यक्रम व बौद्धिक स्पर्धा, दुपारी 1 वाजता आरती व महाप्रसाद , सायंकाळी 4 वाजता जिल्हास्तरीय भजन स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ, 7 वाजता गोपाळकाला – कीर्तनकार हृदयनाथ गावडे यांचे कीर्तन, रात्री 9 वाजता मुलांचे विविध गुण दर्शनपर कार्यक्रम व श्री गजाननाच्या लीला नाटिका आदीं कार्यक्रम होणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री स्वामी प्रतीक्षा भक्ती सेवा मंडळ ( बिबवणे – पळसेवाडी ) यांनी केले आहे.