फुकेरी हनुमंत गडावरील पाण्याच्या तळीची साफसफाई ; सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सिंधुदुर्ग विभागाच्या १८ दुर्गसेवकांचे श्रमदान

36

फुकेरी हनुमंत गडावरील पाण्याच्या तळीची साफसफाई ; सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सिंधुदुर्ग विभागाच्या १८ दुर्गसेवकांचे श्रमदान

बांदा (मंगल कामत)दि १९ एप्रिल २०२४

    सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सिंधुदुर्ग विभागतर्फे फुकेरी येथील किल्ले हनुमंत गडावर स्वछता मोहीम राबविण्यात आली. दोन दिवस श्रमदान करून गडावरील पाण्याची तळीची स्वच्छता करण्यात आली.

   फूकेरी येथील किल्ले हनुमंत गडावर असणारी पाण्याची तळी गाळाने पुर्णपणे भरलेली आहेत. या तळींना वर्षभर पाणी असते. मात्र, गाळामुळे पाणीसाठा होत नसल्याने पाणी लवकर आटते. सदर तळीमधील गाळ काढणे गरजेचे असल्याने सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सिंधुदुर्ग विभागाने साफसफाई करण्याचा निर्णय घेतला. तळी मधील गाळ सफाई बरोबरच आजूबाजूची झाडीझुडपे साफ करण्यात आली. या मोहिमेत एकूण १८ दुर्गसेवकांनी श्रमदान केले.

   हनुमंत गडावर अशा ५ पाण्याच्या तळ्या असून त्यांची सफाई करण्याची मोहीम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या मोहिमेत दिनेश सावंत, औदुंबर परब, सुनिल राऊळ, महादेव धुरी, अजय आरोसकर, हरी आमडोसकर, बंटी आईर, जगदीश सावंत, ऋषी सातपुते, नितीन रासम, गौतम धुरी, वसंत तावडे, अभिषेक आंबेकर, न्हानू आईर, समीर आईर, साहिल आईर, नितिन मेस्त्री, आर्यन मेस्त्रीआदींनी सहभाग घेतला.