भाजपा नेते राजन तेली यांच्या मोबाईल टेट्सची सर्वत्र चर्चा

337

भाजपा नेते राजन तेली यांच्या मोबाईल टेट्सची सर्वत्र चर्चा

सावंतवाडी (प्रतिनिधी)दि.१३ एप्रिल २०२४

भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रचार प्रमुख माजी आमदार राजन तेली यांनी मोबाईल स्टेटसला लावलेल्या मजकुराची जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी प्रतिस्पर्धी उमेदवार व कार्यकर्ते यांच्यामध्ये शाब्दिक आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता नवीन पायंडा पडताना दिसत आहे.काहीजण जाहीर फलक लावत असून तर काहीजण आपल्या मोबाईलचे टेटस लावून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवत आहेत.मात्र राजन तेली यांनी आपल्या मोबाईल स्टेटसला लावलेला मजकूर हा महायुतीच्या विरोधातील उमेदवारांच्या विरोधात नसून महायुतीतलच एका घटक पक्षातपक्षाच्या नेत्याच्या आडमुठे धोरणामुळे लावला असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे जाहीर मेळाव्यांचे नियोजन करण्यात आले होते.मात्र ते काही कारणास्तव रद्द करण्यात आले.याचा धागा पकडून माजी आमदार राजन तेली यांनी आपल्या स्टेटसला मजकूर लावत कुणाच्यातरी हट्टामुळे नियोजित सभा रद्द करण्यात येत असल्याचा उल्लेख केला आहे.यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच महायुतीत आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.आज सावंतवाडी येथे महायुतीच्या उमेदवारांकरिता प्रचार कार्यालयाचा शुभारंभ होता.मात्र महायुतीतील घटक पक्षातील एका मोठ्या नेत्याने आपण असतानाच शुभारंभ करूया असे सांगितल्याने नियोजित शुभारंभ कार्यक्रम रद्द करण्यात आला.या सर्वच घटनांवरून राजन तेली यांनी लावलेल्या मोबाईल टेटस मधील मजकुरात तथ्य असल्याचे निष्पन्न होत आहे.