तळवडे ग्रामपंचायत मध्ये ७२ लाख ८१ हजार ७६ रुपयाचा अपहार,तत्कालीन ग्रामविकास अधिकारी तांबेंसह नऊ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश,तळवडे सरपंच यांना क्लीन चिट
सावंतवाडी (प्रतिनिधी)दि ११ एप्रिल २०२४
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायत मधील अपहार प्रकरणी तत्कालीन ग्राम विकास अधिकारी तांबे सह अन्य नऊ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी दिले आहेत
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत तळवडेमध्ये नामदेव रामचंद्र तांबे तत्कालीन ग्राम विकास अधिकारी कार्यरत असताना आर्थिक गैरव्यवहार प्रकरण घडले होते.याची कार्यालयीन तपासणी सुरू असताना आढळल्या पुराव्यावरून तत्कालीन ग्रामसेवक तांबेंसह इतर नऊ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग विशाल तनपुरे यांनी दिले आहेत.
या आदेशामध्ये खालील प्रमाणे असे नमूद करण्यात आले आहे की, निलंबन सदर प्रकरणी चौकशी समितीने तपासणी करून गट विकास अधिकारी पं.स.जा क्र 44658 दिनांक 23/01/2024 में अभिप्रायासह अहवाल सादर करण्यात आलेला आहे.नामदेव रामचंद्र लांबे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत तळवडे ता. सावंतवाडी यांनी सन 2022-23 सन 2023-24 मधील 15 वा वित आयोग तसेप सन 2021-22 व 2022-23 मधील 14 वा वित आयोग तसेच बान निषी अंतर्गत सन 2021-22 व सन 2022-23 या वित्तीय वर्षात एकूण रक्कम 72,81,076/- एवढ़ा अपहार झाल्याचा अहवाला नमूद करण्यात आलेला आहे.शासन परिपत्रक क्रमांक व्हीपीएम-2016/प्र.क्र.253-3 दिनांक 04 जानेवारी, 2017 मानध्दीक पध 2019 2810-3 दिनांक 18 सप्टेंबर, 2019 ने ग्रामपंचायतीच्या आर्थिक निधीचा अपहार करणे,तसेच ग्रापंचायतीतील मूळ दस्तात फेरफार करणे हा गुन्हा असल्याने त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करणे करिता इतर प्राधिकरणांच्या अवहाला मध्ये, विभागीय चौकशीमध्ये संबंधितांविरुध्द चौकशीमध्ये अपहार झाल्याचे उघड झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा असे स्पष्ट उल्लेख आहे.यानुसारच तळवडे ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक नामदेव रामचंद्र तांबे सह इतर नऊ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा असे सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांना जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पाटील व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी लेखी आदेश दिले आहेत.





