महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग सावंतवाडी शाखेच्या अध्यक्षपदी रामचंद्र कुडके,तर उपाध्यक्षपदी अतुल माईणकर यांची निवड

97

महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग सावंतवाडी शाखेच्या अध्यक्षपदी रामचंद्र कुडके,तर उपाध्यक्षपदी अतुल माईणकर यांची निवड 

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)दि ३१ मार्च २०२३

महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुका शाखा – सावंतवाडीच्या अध्यक्षपदी रामचंद्र कुडके,तर उपाध्यक्षपदी अतुल माईणकर यांची निवड करण्यात आली.तर सावंतवाडी तालुक्याच्या वतीने जिल्हाप्रतिनिधी म्हणून दत्तात्रय उर्फ बाळ  गणपती पुराणिक,केदार सुरेश म्हसकर यांची निवड करण्यात आली आहे.
सावंतवाडी तालुक्याच्या नूतन पदाधिकारी अणि कार्यकारिणी सदस्यपुढील प्रमाणे आहेत.तालुकाध्यक्ष रामचंद्र दामोदर कुडके – (कास बांदा),उपाध्यक्ष अतुल निळकंठ माईणकर(सावंतवाडी),कार्यवाह सौ स्नेहल समीर गोरे – कोलगाव),सहकार्यवाह,सुधीर उद्धव कशाळीकर(सावंतवाडी),खजिनदार राजेंद्र विष्णु डोंगरे (सावंतवाडी),कार्यकारणी सदस्य म्हणून अजित गाडगीळ (मळेवाड), सुनील नातू(बांदा),सौरभ सिध्दये- (कोनशी),दत्तप्रसाद जी चिपळूणकर (ओटवणे),हेमंत नाख्ये (तळवडे),पंकज आपटे(माठेवाडा), सौ स्मिता कशाळीकर -(सालईवाडा)सावंतवाडी ब्राह्मण मंडळ शाखा सावंतवाडीच्या सर्व तालुका कार्यकारणी पदाधिकारी व सदस्यांचे मावळते अध्यक्ष श्रीप्रसाद रमाकांत मराठे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.नवनिर्वाचित तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पदग्रहण सोहळा सावंतवाडीतील महालक्ष्मी मंगल कार्यालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे.