महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाच्या सिंधुदुर्गच्या अध्यक्ष पदी अरुण गोगटे तर सचिव पदी दत्तात्रय उर्फ बाळ पुराणिक यांची निवड झाली
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)दि ३१ मार्च २०२४
महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ सिंधुदुर्ग च्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी बैठक घेण्यात आली त्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी अरुण गोगटे यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. उपाध्यक्ष विघ्नेश गोखले, कार्यावाह दत्तात्रय उर्फ बाळा पुराणिक, खजिनदार संदीप मणेरीकर, सदस्य धनश्री बर्वे, केदार म्हसकर, प्रकाश कुंटे, भूषण बोडस, विवेक गोखले,केदार भिडे यांची निवड झाली आहे. सदर कार्यकारिणीचा कालावधी ३ वर्षांसाठी आहे. यात सर्वानुमते नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.जिल्हाध्यक्ष अरुण गोगटे यांनी आपले जिल्हाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व ज्ञाती बांधवांचे आभार मानले.तसेच ज्ञाती बांधवांना भविष्यात येणाऱ्या अडचणी,समस्या, या करिता आपल्या सहकाऱ्यांसमवेत सर्वतोपरी मदत करणार असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.तसेच मंडळाच्या प्रगतीसाठी आपण नियमित तत्पर असणार असल्याचेही आश्वासन दिले.मंडळाची बैठक शांतादुर्गा मंगल कार्यालय पावशी कुडाळ येथे झाली.
बैठकीला पूर्ण जिल्ह्यातून ज्ञाती बांधव उपस्थित होते





