विलवडेत शिमगोत्सव उत्साहात साजरा

8

विलवडेत शिमगोत्सव उत्साहात साजरा

बांदा (प्रतिनिधी)३० मार्च २०२४

महाराष्ट्रात   कृषी प्रधान गांव  नाैकिक असलेले व निसर्गसंपन्न व जैवविविधतेने समृद्ध असलेले विलवडे गावात सात दिवशीय शिमगोत्सव उत्साहात  साजरा करण्यात आला.  विलवडे चव्हाटयावर होळी आवारात  गावातील मानकरी , ग्रामस्थ, व सर्व  भाविकांनी युवकांपासून आबालवृद्धानी धुळवट मारल्यानंतर   रंग लावून होळी उत्सवाचा आनंद लुटला.
         जेष्ठांच्या व गाव मानकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावचे धार्मिक रीतीरिवाज , संस्कृती व परंपरा याचे जतन करीत आहे. शनिवारी सायंकाळी या  नावणं  होळी कडे  नारळ ठेवून महा गाराणे घालणे.  घोडेमोडणी, नारळ तोंडणी आदि कर्यक्रमात उत्साहात  साजरे झाले.  त्यानंतर  ‘ धूळवड ‘ मारून रोबाटां मारत   पिपळेश्वर  येथे होळीचा नारळ तोडणी केल्यानतर नदीवर आघोंळ केल्यानंतर  शिमगोत्सवाची सांगता झाली. उद्या रविवारी  सकाळ पासून संध्याकाळ,रात्री उशिरापर्यत देव प्रत्येकांची घरी घेत न्हानव्हंनाचा देण्यांचा कार्यक्रम होणार आहे.