सातोसेत संगीत पंढरीची वारी’ नाटक

9

सातोसेत संगीत पंढरीची वारी’ नाटक

बांदा प्रतिनिधी २६ मार्च २०२४

     सातोसे – दुर्गवाडी येथील श्री देव ब्राम्हण नाट्यमंडळातर्फे शिगमोत्सवानिमित्त बुधवार २७ मार्च रोजी रात्री १० वाजता ‘संगीत पंढरीची वारी’ हे नाटक आयोजित केले आहे. सातोसे देऊळवाडी येथे कै. आबासाहेब सरदेसाई रंगमंचावर सदर नाटक होईल. सदर नाटकाचे दिग्दर्शन पांडुरंग पांगम (पणजी), संगीत शिवानंद दाभोलकर (गोवा), ऑर्गन साथ अमोल मांजरेकर (सातोसे), तबला सूरज मोरजकर (मडूरा), पखवाज किशोर तेली (कोंडूरा), तालरक्षक वैभव चोडणकर, पार्श्वसंगीत विशाल आसोलकर, ध्वनी संकलन सुभाष शिरोडकर (बांदा) व नेपथ्य लवुकृपा सोपटे नाट्य भांडार (पार्से गोवा) यांचे आहे. श्री देव ब्राम्हण नाट्य मंडळाच्या कलाकार समवेत गोव्याची आघाडीची अभिनेत्री स्नेहल गुरव प्रमुख भूमिकेत मी आहेत. नाट्य रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन सातोसे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.