सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांना “डॉक्टरेट”
सामाजिक कार्य क्षेत्रातील सादर केलेल्या प्रबंधासाठी डॉक्टरेट पदवी बहाल
समाजशास्त्र व सामाजिक विषयात प्राविण्य मिळाल्याबद्दल कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगौड यांनी दिल्या शुभेच्छा
कणकवली (तुळशीदास कुडतरकर)दि १४ मार्च २०२४
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांना कर्नाटक राज्यातील एका नामांकित विद्यापीठाने त्यांच्या सामाजिक कार्य क्षेत्रातील सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली. ही मात्र मोठी अभिमानाची गोष्ट आहे.असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता श्री अजयकुमार सर्वगोड यांनी काढले.
सर्वगोड यांनी प्रविण गावडे यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड म्हणाले की,
प्रसाद गावडे डॉक्टरेट झाले. गावडे हे आपले अतिशय जवळचे मित्र आहेत. श्री प्रसाद गावडे हे डॉक्टरेट झाले याचा आपल्याला अतिशय मनस्वी आनंद झाला. श्री प्रसाद गावडे हे गोर गरीब कामगारांसाठी त्यांना लाभ अणि हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने ते झटत असतात. कामगार क्षेत्रात त्याचे मोठे योगदान आहे .सामाजिक प्रश्नांसाठी अणि शासनाचा कारभार गतिमान अणि पारदर्शक होण्यासाठी सुद्धा त्याची सातत्याने धडपडत सुरू असते.
भ्रष्ट्राचार निर्मूलन साठी सुद्धा त्यांची भूमिका अतिशय आग्रही आहे अणि सर्व सामन्यांच्या हितासाठी सातत्याने त्यांची धडपड सुरू असते. म्हणुनच काय त्यांची अणि माझी अगदी घट्ट मैत्री झाली आहे.असे सर्वगोड यांनी सांगितले.
प्रसाद गावडे यांच्या मध्ये राजकारणी पेक्षा एक मोठा समाज सेवक लपला आहे,.याची अचूक जाणीव मला आहे. म्हणुनच मला त्यांच्या कार्याला सलाम करावा असा वाटतो.असेही त्यांनी सांगितले.





