देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होईल -.दर्शना‌ कोलते

52

देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होईल -.दर्शना‌ कोलते

श्री.देवी भगवती विद्यालय आंब्रड येथे महिला दिन उत्साहात साजरा

पाककला,संगित खुर्ची स्पर्धा संपन्न

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)दि १० मार्च २०२४

देशाच्या विकास आणि आधुनिकीकरणा सोबतच महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता हाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. एक निरोगी आणि सशक्त स्त्री तिच्या कुटुंबाच्या, समाजाच्या आणि संपूर्ण राष्ट्राच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देते. असे प्रतिपादन डॉ. दर्शना‌ कोलते यांनी केले.

श्री.भगवती माध्यमिक विद्यालय आंब्रड येथे महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ.मानसी कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, संस्था अध्यक्ष आबा मुंज, सौ.कल्पिता मुंज,सचिव संदीप परब,सहसचिव पांडुरंग दळवी,‌मुख्याध्यापक राजेंद्र राठोड,ग्रा.पं.सदस्या संगिता मेस्त्री,सौ.सुनिता नाईक, राजेंद्र शिंपी,सौ.एन.एन.हरमलकर,सौ.आर.आर.कसालकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.दर्शना‌ कोलते म्हणाल्या की, देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकेल.
महिलांनी सकस आहार घ्यावा व्यायाम आणि स्वच्छता यासाठी प्राधान्य द्यावे.असे त्यांनी सांगितले.

महिलांनी शरीराची स्वच्छता सांभाळली तर आजार कमी होतात.वर्षातुन एकदा आपली प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करुन घ्यावी.त्यामुळे आरोग्याची काळजी घेता येईल.असे‌ त्यांनी सांगितले.

यावेळी क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांनी मुलींना खेळांमध्ये असणाऱ्या शैक्षणिक संधी आणि नोकरी मध्ये असणारे आरक्षण याबाबत मार्गदर्शन केले. तसेच क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन नावलौकिक मिळवा.असे मार्गदर्शन केले.

महिला दिनाचे औचित्य साधून घर
आणि कुटुंब सांभाळताना समाजसेवेचा वसा घेतलेल्या
आशासेविका शितल दिपक चव्हाण, विशाखा गोपाळ परब, सीआरपी प्रियांका चव्हाण,प्राची प्रसाद दळवी , सुष्मिता सुभाष राऊळ, अंगणवाडी मदतनीस रोहिणी उदय तांबे या
महिलांना पूजेचे ताट आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

माजी विद्यार्थी अतुल दळवी आणि मंगेश चव्हाण यांच्या सौजन्याने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले होते.या शिबिरात दृष्टी दोष‌ आढळून आलेल्या १३ विद्यार्थ्यांना आज चष्मा वाटप करण्यात आले.

महिला दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून आज महिलांसाठी पाक कला, संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी महिलांनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
पाककला स्पर्धेत प्रथम- नम्रता नारायण पाडावे, द्वितीय -विभावरी भोगटे, तृतीय -साक्षी स्वप्निल नाईक उत्तेजनार्थ नेहा कदम, विजेत्या ठरल्या.संगीत खुर्ची मध्ये प्रमोदीनी प्रभाकर गरुड विजेत्या ठरल्या.

यावेळी माता- पालक आणि गावातील महिलां मोठ्या संख्येने महिला दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित होत्या.