विनायक राऊत यांच्या विजयात कणकवली विधानसभा मतदारसंघात युवा सेना सिंहाचा वाटा उचलेल – सुशांत नाईक
कणकवली (तुळशीदास कुडतरकर) ८ मार्च २०२४
कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील मुंबईस्थित शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचा मेळावा 13 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता शिवसेना भवन मुंबई येथे खासदार विनायक राऊत, उपनेते अरुण दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली.
ते कणकवलीत विजयभवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर,कलमठ विभाग प्रमुख अनुप वारंग उपस्थित होते.
यावेळी सुशांत नाईक म्हणाले की,
खासदार विनायक राऊत यांनी केलेली विकासकामे जनतेच्या मनात आहे. त्यामुळे जनताच राऊत याना लीड ने विजयी करेल. कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात युवा सेना जोमाने काम करून राऊत यांच्या विजयात हातभार लावणार आहे. असे त्यांनी सांगितले.
गावागावात मागील दोन वर्षांत युवासेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आहेत. याचा फायदा लोकसभा निवडणुकीत होणार असून विनायक राऊत यांच्या विजयात कणकवली विधानसभा मतदारसंघात युवा सेना सिंहाचा वाटा उचलेल असा विश्वास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.





