बांदा पोलिसांनी अवैध दारू व च्या वाहनावर कारवाई करत 15 लाख 84 हजार रुपयांची दारू जप्त केली व पेट्रोलिंग करणारी बोलेरो गाडी ही जप्त
बांदा (प्रतिनिधी) दि ५ मार्च २०२४
गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर बांदा पोलिसांनी तपासणी नाक्यावर केली कारवाई तब्बल 15 लाख 84 हजार रुपयांचा दारू सह एकूण 27 लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी बोरप प्रेम , कुमार वंका प्रवीण राहणार दोघेही आंध्र प्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई पहाटे सुमारे चार वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. गोवा मुंबई महामार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने बांदा पोलीस नाक्यावर वाहनांची कसूर तपासणी केली जात असते
गोवा ते मुंबई असा टेम्पो क्रमांक ए पी 23 एक्स 33 54 हा बांधा पोलिसांच्या तपासणी नाक्यावर आल्यानंतर तो थांबविण्यात आला त्यावेळी एपी १६ इ एफ 24 69 ही बलेरो गाडी ही पायलटिंग करताना आढळून आल्याने पोलिसांनी ती गाडी थांबवली टेम्पोच्या टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोच्या हौद्यात रियल व्हिस्की कंपनीच्या 16 लाख 84 हजार रुपयांची दारू अवैधित्या आढळून आली ती पोलिसांनी जप्त केली तसेच सात लाख रुपयांचा टेम्पो व पाच लाखाची बोलेरो गाडी आयफोन मोबाइल असा सुमारे 27 लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई आज पहाटे बांदा पोलीस बांदा पोलीस सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शकाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील पडवळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम पालकर पोलीस हवालदार चंद्रशेखर मुंडेकर पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद पाटील होमगार्ड शेडगे आदींनी केली





