मंजूर रस्त्याचे कामाला सुरुवात न केल्याने न्हावेली सरपंच उपसरपंच यांनी दिला उपोषणचा इशारा
सावंतवाडी (हेमंत मराठे)दि.४ मार्च २०२४
न्हावेली येथील मंजूर रस्त्याचे कामाला सुरुवात न केल्याने न्हावेली सरपंच उपसरपंच यांनी उपोषणचा इशारा दिला आहे.
माऊली मंदिर रस्ता ते ज्ञानदेव सगुण नाईक यांच्या घरामागून जाणारा जोड रस्ता खडिकरण डांबरीकरण काम मंजूर असून ते काम ते काम मंजुर असून या कामास १ वर्षाचा कालावधी लोटला आहे, तरी अजूनही हे काम सुरू झालेले नाही. हे काम ८ दिवसात सुरू न झाल्यास दि. ०७/०३/२०२४ रोजी आपल्या कार्यालयासमोर ग्रामस्थांसमवेत बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा न्हावेली सरपंच अंकित धाऊसकर,उपसरपंच संतोष नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता याना निवेदन देऊ दिला आहे.





