थ्रीप्स संदर्भात १६ फेब्रुवारी रोजी
औषध कंपन्या,डीलर,आंबा बागायतदार यांची संयुक्त बैठक
आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती
देवगड (प्रतिनिधी)
आंबा बागायतदारांसमोर थ्रिप्सचे मोठे संकट असून यातून मार्ग कसा काढायचा यासाठीच आम्ही थ्रिप्सचे संशोधन करण्यासाठी कीटक शास्त्रज्ञ श्री मुंज यांची नियुक्ती केली आहे. आंबा बागायतदाराचा कृषी अधिकार्यांवर रोष आहे. मूळ कंपन्या डीलरच्या माध्यमातून
आंबागातदारांपर्यंत औषधे पोचवत आहेत.मात्र अधिकारी वर्ग अजूनही सांगतो थ्रीप्स वर संशोधन झालेले नाही अजून प्रयत्न सुरू आहेत तर मग डीलरच्या माध्यमातून आंबा बागायतदार शेतकरी यांना विकली जाणारी औषधे देऊन फसवण्याचे काम करीत आहे. महागडी औषधी पोहोचवली जातात मात्र त्याचा काही फरक न पडता उलट आंबा
बागायतदारांचे नुकसानच वाढत आहे. आणि यावर संबंधित अधिकारी कंपन्यांवर कारवाई का करत नाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय .यासाठीच येत्या १६ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता देवगड खरेदी विक्री संघ कार्यालयातच संबंधित कंपन्या डीलर व बागायतदार यांची संयुक्त बैठक घेणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी देवगड येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
देवगड तालुका आंबा बागायतदार यांची बैठक आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली देवगड येथील खरेदी विक्री सभागृहात संपन्न झाली यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे बोलत होते.
यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष विलास रुमडे,जिल्हा बँकेचे संचालक अँड प्रकाश बोडस,
संकेत लब्दे,आदी उपस्थित होते.
महागडी औषधे वापरून नुकसान होत असल्याने येथील शेतकरी वर्ग आता पैसे न भरण्याची भूमिका घेणार आहे. औषध कंपन्या रिकव्हरीसाठी आता शेतकऱ्यावर केसेस टाकतील. त्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न देखील राणे यांनी उपस्थित केला. शासन म्हणून आपली जबाबदारी असून येथील शेतकऱ्यांना यातून कायमस्वरूपी बाहेर काढायचे आहे. द्राक्षाचे औषध आंब्यांसाठी वापरले तर त्याचा इफेक्ट आणि फायदा नाही. ही शेतकऱ्यांची फसवणूकच झाली आहे. शेतकऱ्यांचा फायदा करण्याऐवजी शेतकऱ्यांची फसवणूकच कंपनी करत आहे.
त्यामुळे आपली तालुक्यातील डीलरना विनंती आहे. आपणही आमचे शेतकरी बांधव आहात. कंपन्या येथील आंबा बागायतदारांची फसवणूक करत असतील तर हे थांबवलं पाहिजे. याची तुम्ही दक्षता घ्या. योग्य औषध मार्केटमध्ये संशोधन करून येत नाही, तोवर गप्प बसणार नाही. औषध कंपन्यांचे डीलर हे डीलर कंपन्यांशी करार असल्यामुळे ते आपले काम करत आहेत . आज ज्या कंपन्या औषध विकत आहेत त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर त्या कंपन्यांवर फौजदारी दाखल करणार तसेच थ्रीप्ससाठीच नव्हे तर भविष्यातही शेतकरी आंबा बागायत यांना फसविण्याची हिंमत हिंमत कोण करेल तर गप्प बसणार नाही .
चुकीची पद्धत असेल तर ती मोडून काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. यासंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषीमंत्री यांची भेट घेणार असून आंबा बागायतदारांची चूक नसून त्यांची फसवणूक झाली आहे हे त्यांना पटवून देणार आहे. आमचे सरकार सर्व आंबा बागायतदार यांच्यासोबत संकट काळात उभे राहिलं आहे असेही आमदार राणे यांनी यावेळी सांगितले.





