भिरवंडेतील हरिनाम सप्ताहात कृषी अवजारांचे प्रदर्शन, शेतकऱ्यांना होणार फायदा…!

कणकवली : श्री. देव रामेश्वर मंदिर हरिनाम सप्ताहाणे भिरवंडे येथे कृषी अवजारांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी व सावंत पटेल उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग चे अध्यक्ष मोहन सावंत व देवालय संचालक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी नितीन सावंत सरपंच, सोसायटी चेअरमन बेनी डिसोझा, शिवाजी सावंत, काव्या कृषी सेवा केंद्राचे प्रवीण राऊत, भाई सावंत, अरुण सावंत, अरविंद सावंत, श्रद्धा सावंत, कृषी सहाय्यक अर्चना केंद्रे, ज्योती सावंत, ऋषिकेश सावंत, प्रशांत सावंत, भिकाजी सावंत, पोलीस पाटील बाळकृष्ण सावंत, दशरथ सावंत, संदीप डोंगरे, जगदीश सावंत आदी उपस्थित होते.

श्री देव रामेश्वर देवालयाचे संचालक मंडळ, भिरवंडे ग्रामपंचायत, भिरवंडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी व काव्या कृषी सेवा केंद्र कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात आले. या कृषी विषयक प्रदर्शनात पॉवर टिलर, भात कापणी यंत्र, पॉवर विडर, बॅटरी फवारणी पंप, नारळ शिडी, ग्रास कटर, आदी अवजारे ठेवण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत. आयोजकांकडून शेतकऱ्यांना कृषी अवजारांची माहिती देत त्यांचे अर्ज भरून घेण्यात आले.