देवगड आगाराच्या समस्येकडे मनसे उपजिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी वेधले लक्ष

95

लांब पल्ल्याच्या गाड्या वाटेत होत आहेत नादुरुस्त ; प्रवाशांची होते गैरसोय

देवगड आगाराच्या समस्येकडे मनसे उपजिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री यांनी वेधले लक्ष

देवगड (प्रतिनिधी)

देवगड आगारातून लांब पल्ल्याच्या प्रवासी फेऱ्या या वाटेत नादुरुस्त होणे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय खोळंबा होत आहे तसेच देवगड आगारातील बहुतांशी एसटी गाड्या जुन्या जीर्ण झाल्या असून ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्या ह्या विलंबाने सुटणे प्रसंगी रद्द होणे यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी हैराण झाला आहे त्यामुळे देवगड आगाराला नवीन एसटी गाड्या उपलब्ध करून देण्यात याव्या व लांब पल्ल्याच्या प्रवासी फेऱ्या सुस्थितीत सोडण्यात याव्यात कोणतीही पूर्व सूचना न देता प्रवासी रद्द करण्यात येऊ नये प्रवासी फेऱ्या या नियमित सुरू ठेवण्यात याव्यात .अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हाध्यक्ष चंदन मेस्त्री यांच्या समवेत मनसे शिष्टमंडळाने व्यवस्थापक निलेश लाड यांच्याकडे केली आहे.यात येत्या आठवडाभरात सुधारणा न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल असा इशाराही या निमित्ताने त्यांनी आगार व्यवस्थापकाना दिला आहे.
प्रामुख्याने तालुक्यातील तोरसोळे,कातवण,व अन्य ग्रामीण भागातील प्रवासी फेऱ्याच्या बाबत देखील त्यांनी तक्रारींचा मांडल्या सायं ६ वाजलेनंतर देवगड आगारात जबाबदार अधिकारी नसल्याने प्रसंगी निर्माण होणाऱ्या अडचणीं व तक्रारींना ना वाहतूक नियंत्रक याना सामोरे जावे लागते. याकडे गांभीर्याने यांनी लक्ष द्यावे तसेच गाड्यांमध्ये आवश्यक ते दुरुस्ती साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे .अशी सूचनाही केली देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीत प्रवासी शेड समोर उभारण्यात आलेले वॉटर एटीएम बंद अवस्थेत असून ते हटविण्यात यावे जेणेकरून प्रवासी निवारा शेडमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना जाणारे व येणारी प्रवासी फेरी दिसू शकेल त्यामुळे रस्त्यांमध्ये होणारी गर्दी हे टाळता येईल अशी मागणी करण्यात आली कुणकेश्वर यात्रेकरिता तारामुंबरी पूल मिठमुंबरी श्री मुंब्रादेवी मंदिर मार्गे कुणकेश्वर ही जादा यात्रा फेरी यात्रा काळात सोडण्यात यावी अशी मागणीही या चर्चेत केली .
या शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष चंदन मेस्त्री यांचे समवेत तालुका सचिव जगदीश जाधव , देवगड शहर अध्यक्ष सचिन राणे तोरसोळे शाखाध्यक्ष राजन पवार कातवण विभाग अध्यक्ष नंदकिशोर हडकर शाखाध्यक्ष तेजस खोत मनसैनिक अजय कातवनकर , परेश आडकर,राजा मोंडकर उपस्थित होते.