श्री स्वामी समर्थांच्या जयघोषात स्वामींच्या पादुकांचे बांदानगरीत येथे जल्लोषी स्वागत
बांदा (मंगल कामत)
आनंद कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज पूर्णदत्त अवतार श्री स्वामी समर्थ महाराज की जय,महाराज श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ या जयघोषात बांदा नगरीत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे भव्य मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ,अक्कलकोट यांच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात य़ेणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखी फेरीचे शनिवारी बांदा येथे स्वागत करण्यात आले.बांदा येथिल विठ्ठल मंदिरात सकाळी 9 वाजता पालखीचे आगमन झाले. यावेळी उमेश मयेकर व उमांगी मयेकर या दांपत्याने पादुकांचे पुजन केले.त्यानंतर आरती होऊन शिराप्रसाद वाटण्यात आला.यावेळी स्वामीभक्तांनी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केले. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.त्यानंतर पालखीचे पुढे घारपी येथिल श्री स्वामी समर्थ मठाकडे प्रस्थान झाले. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला.






