नेमळे-बादे-तळवडे रस्ताचे मंजूर कामास सुरुवात न झाल्यास २६ जानेवारीला बसणार उपोषणाला

121

नेमळे-बादे-तळवडे रस्ताचे मंजूर कामास सुरुवात न झाल्यास २६ जानेवारीला बसणार उपोषणाला

सावंतवाडी (प्रतिनिधी)

तळवडे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणा-या रस्त्याच्या डांबरीकरण चे काम तात्काळ सुरू करावे अशा मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग ला देऊन केली आहे.

नेमळे-बादे-तळवडे रस्ता, प्र.जि.मा. ५०. सुधारणा व डांबरीकरण करणे, मंजूर रक्कम 1 कोटी 5 लाख रुपये, हा रस्ता महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मंजूर झालेला असून, रस्त्याच्या कामाचे उद्‌घाटन होवून, प्रत्यक्षात कामाची (खडीकरण) सुरुवात झालेली होती. परंतु पावसाळा सुरु झाल्याचे कारणाने उर्वरिता पुढील काम थांबविण्यात आले. आता पावसाळा संपून ५ महिने झालेत तरी सु‌द्धा प्रत्यक्षात काम सुरु झालेले नाही किंवा काम सुरु करण्याबाबत शासन-प्रशासनाकडून कोणतीही दखल घेताना दिसून येत नाही. त्यामुळे हा रस्ता गावातील ग्रामस्थांना तसेच वाहनांना अत्यंत त्रासदायक बनलेला आहे. तरी सदरचे पत्र मिळाल्यापासून ४ दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्यास दिनांक २६/०१/२०२४ रोजी नेमळे-बादे तळवडे (तळवडे-गेट बाजार) या रस्त्यावर उपोषणास बसणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी साहेब बांधकाम विभाग चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन दिला आहे