कुणकेश्वर मंदिर येथे २१ जानेवारीला  स्वच्छता अभियान ; केद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती

99

कुणकेश्वर मंदिर येथे २१ जानेवारीला  स्वच्छता अभियान ; केद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती

देवगड (प्रतिनिधी).१९ जानेवारी

               अयोध्यानगरीमध्ये २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या राममंदिर प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आदेश दिल्यानुसार संपूर्ण राज्यभरातील गावांमधील मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबविले जात आहे.यानिमित्ताने कुणकेश्वर मंदिर येथे रविवार २१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.तरी सर्व जिल्हा पदाधिकारी,माजी.जि.प सदस्य,माजी पंचायत समिती सदस्य,सर्व तालुका कार्यकारणी तसेच माजी आजी नगरसेवक सर्व सरपंच व बूथ अध्यक्ष यांनी कुणकेश्वर येथील स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी केले आहे.