आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक भाऊ पांगम यांचा १६ जानेवारीला स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

90

आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक भाऊ पांगम यांचा १६ जानेवारीला स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी (हेमंत मराठे)

सावंतवाडी -आरोस शिक्षण प्रसारक हि मंडळाचे संस्थापक (कै.) आनंद (भाऊ) पांगम यांचा स्मृतिदिन १६ जानेवारी २०२४ ला सकाळी १० वाजता साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन विद्या बिहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे केले आहे. कार्यक्रमाला जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक दळवी, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे, संजय गांधी निराधार समिती सावंतवाडी अध्यक्ष गजानन नाटेकर तसेच पंचक्रोशीतील सर्व सरपंच उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास पालक व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आरोस शिक्षण प्रसारक मंडळ शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शिक्षक मोहन पालेकर यांच्याशी संपर्क साधावा.