११ ते १४ जानेवारी या कालावधीत कणकवली पर्यटन महोत्सवाचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचा असलेला कणकवली पर्यटन महोत्सव ११ ते १४ जानेवारी या कालावधी संपन्न होत आहे. या पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण,आमदार नितेश राणे,माजी आमदार प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर ,संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते ११ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता होणार आहे.तर या पर्यटन महोत्सवाचा समारोप कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नारायण राणे, गिरीश महाजन, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ जानेवारीला होणार आहे . ११ ते १४ जानेवारी असा हा चार दिवसाचा महोत्सव असणार आहे. अशी माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवली येथील भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी माजी नगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक संजय कामतेकर,भाजपा शहर अध्यक्ष अण्णा कोदे, राजा पाटकर, श्री पेडणेकर आदी उपस्थित होते.
या महोत्सवात पहिल्या दिवशी रंगीत संध्या रेट्रो टू मेट्रो व फु बाई फु फेम कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे. शशांक कल्याणकर यांच्या आर्केस्ट्रा व नामवंत सात कलाकार असणार आहेत. फु बाई फु फेम सागर कारंडे, हेमांगी कवी, यांची कॉमेडी पाहायला मिळणार आहे. तर 12 जानेवारीला आम्ही कणकवलीकर यांचा कणकवली व लगतच्या गावातील कलाकारांचा सुहास वरूणकर प्राध्यापक हरिभाऊ भिसे प्रस्तुत 300 नामवंत कलाकारांसहित संगीत ,नृत्य, व कॉमेडी असा रंगतदार कनकसंध्या कार्यक्रम व पदर प्रतिष्ठान महिलांच्या कार्यक्रम होणार आहे.
१३ जानेवारीला ८ वाजता इंडियन आयडल फेम सायली कांबळे आशिष कुलकर्णी निहार तौरो या नामवंत कलाकाराचा हिंदी व मराठी गाण्यांचा भव्य कार्यक्रम तर १४ जानेवारीला या पर्यटन महोत्सवाचा ९ वाजता समारोप होईल . यानिमित्त प्लेबॅक सिंगर दिव्यकुमार, नचिकेत लेले, चेतना भारद्वाज,संचिता गर्गे यांचा आर्केस्ट्रा होणार आहे. या कार्यक्रमास कणकवलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.





