तळवडे – खेरवाडी येथे श्री बामणादेवीचा वार्षिक जत्रोत्सव २२ रोजी होणार.!

24

सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे खेरवाडी येथे दिनांक २२ डिसेंबर २०२३ वार शुक्रवार रोजी श्री बामणादेवी मंदिरचा वार्षिक जत्रोत्सव होणार आहे. ‘नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी’ अशी ही देवीची ख्याती आहे. सकाळी देवाची पूजा होईल. त्यानंतर ओटी भरणे, नवस फेडणे आणि रात्री १२ वाजता पालखी सोहळा व लोटांगण, फटाक्यांची आतषबाजी व रात्री १ वाजता कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा दणदणीत दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. तरी सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन गावकर बांधव व ग्रामस्थांनी केले आहे.