सावंतवाडी : येथील सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या कनिष्ठ महाविद्यालय विभागाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना आज सकाळी प्रारंभ झाला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन ह. हा. शुभदादेवी भोंसले राणी सरकार यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल भारमल, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. व्ही. पी. राठोड, प्रा, अमोल कांबळे, प्रा. भिसे, प्रा. सौ. पूनम सावंत – नाईक, प्रा. गवळी, प्रा. आर. एम. सावंत, प्रा. के. पी. लोबो, तसेच सर्व स्टाफ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देण्यात आली.






