दिव्यांग कलाशिक्षक बाळासाहेब पाटील यांनी पुनश्च घातला ‘सामाजिक आदर्श.!’ ; जागतिक दिव्यांग दिनानिमीत्त ‘अनन्या’ला घेतले शैक्षणिक दत्तक.!

43

सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयाचे उपक्रमशील दिव्यांग कलाशिक्षक बाळासाहेब आबाजी पाटील यांनी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून आरोस – दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयाची आरोंदा गावची दिव्यांग मतिमंद विद्यार्थीनी कुमारी अनन्या रेडकर हिला बाळासाहेब पाटील यांनी दिव्यांगाप्रती सामाजिक बांधिलकी म्हणून सन २०२३-२४ शैक्षणिक सालासाठी दत्तक घेतले आहे.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अनन्याला सर्व शैक्षणिक साहित्य बॅग, चित्रकला साहित्य, वॉटर बॅग, दोन ड्रेस, वह्या, पेन पेन्सील व खाऊ भेट देण्याचा कार्यक्रम आरोस – दांडेली येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयाच्या नविन इमारतीमध्ये मुख्याध्यापक सतीश उकरंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष बाळासाहेब आबाजी पाटील यांनी वरील सर्व साहित्य अनन्या हिला भेट देण्यात आले. या वेळी सर्व दिव्यांग मुलानांही खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास माऊली कर्णबधिर व माऊली मतिमंद विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.