शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भारतीय किसान संघ महाराष्ट्राच्या सावंतवाडी शाखेने कंबर कसली.! ; प्रांताधिकार्‍यांना निवेदन देत शासनाचे वेधले लक्ष्य.

72

सावंतवाडी : सध्या राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून अनेक प्रश्न बळीराजाला भेडसावत आहेत. या सर्व प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी भारतीय किसान संघ सिंधुदुर्गच्या वतीने आज प्रांताधिकारी सावंतवाडी यांना निवेदन देण्यात आले. आपल्या मागण्यांवर प्रशासनाने तात्काळ विचार करावा व शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. तसेच निवेदनाच्या मागणीनुसार अंमलबजावणी करावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या हितार्थ किसान संघाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, असाही इशारा यावेळी भारतीय किसान संघ सिंधुदुर्ग शाखेने दिला आहे. यावेळी भारतीय किसान संघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तानाजी सोमा सावंत, मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, भारतीय किसान संघ सिंधुदुर्ग उपाध्यक्ष सूर्यकांत भिकाजी कुंभार, कोषाध्यक्ष रामकृष्ण पंतवालावलकर, जिल्हापती अभय भिडे, कुडाळ तालुकाध्यक्ष जयराम परब, कार्यकारणी सदस्य रामचंद्र शिंगारे,  महिला जिल्हाध्यक्ष रसिका पारकर, महीला तालुका प्रमुख स्वाती पिंगुळकर, धनश्री सारंग, शीला रावले, अक्षय बाणे, महेंद्र धुरी, विजय परब, मेघना सावंत, मेघशाम राणे आदि उपस्थित होते.

किसान संघाच्या ह्या आहेत मागण्या – 

१} दुष्काळ परिस्थितीत कुणाल सर्वे करून उर्वरित तालुक्याचा समावेश करावा
२} दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यात उपायोजनेची तात्काळ अंमलबजावणी सुरू करावी.
३} विज बिल आकारणी सदोष असून त्यामध्ये प्रचंड अनागोंदी आहे सबब एक वेळ वीज बिल थकबाकी सरसकट माफ करावी तसेच अन्नसुरक्षा कायदा अंतर्गत केंद्र सरकारकडून वर्षानुवर्षी मिळणारे वीस पुरवठा वरील अनुदान व त्यांच्यावर श्वेतपत्रिका काढावी
४} मागील त्याला विनाअट ९०% अनुदानवर सौर शेती पंप योजना उपलब्ध करून द्यावी
५} पीक विम्याचे अग्रीम पिक विम्याचे अग्रीम २५% नुकसान रकमेचे व अंतिम नुकसान भरपाई चे तात्काळ वाटप करायचे आदेश विमा कंपन्यांना द्यावेत
६} खरिपात नुकसान होऊन सुद्धा पुन्हा कर्जाऊ भांडवल उभारून यावर्षी रब्बी पिकाची पेरणी केली होती परंतु गत पंधरावड्यात पासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे उगवून आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत त्यांचे नुकसान भरपाई हेक्टरी २५हजार रुपये देऊन पीक कर्जाचे पुनर्गठन करावे
७} वाढीव पाणीपट्टी केलेली जलसंपत्ती नियमात प्राधिकरणाचा एक दि.२९/०३/२०२२ हा जुलामी आदेश तात्का रद्द करावा
८} ऊस एफ आर पी ची अंमलबजावणी राज्य सर्व साखर कारखान्यांना सक्तीची करावी व प्रति टन ४०० रुपये बोनस उत्पादकांना राज्य सरकारने मंजूर करावा
९} प्रामाणिक कर्जदार यांना जाहीर केलेले प्रोत्साहन अनुदान ५० हजार अद्याप अदा केले नाही ते तात्काळ जमा करावे वन्यप्राणी पक्षी जीव यांच्या कडून होणारी पिकांची नुकसान भरपाई १००% सरकारने करावी अन्यथा त्याच्यापासून संरक्षण करावे {आवश्यक तर प्राणी हत्या} अधिकार शेतकऱ्यांना द्यावे.
११ }मा. राज्याने सुरक्षा आयोग आयोगाचे अध्यक्ष यांनी विविध सवलतीचे धान्य वाटप योजनेसाठी धान्य खरेदी स्थानिक पातळीवर करण्याची केलेली शिफारस तात्काळ अमलात आणावी
१२} हमीभावापेक्षा कमी बाजार भाव सर्व पिकांना मिळत आहे त्यासाठी पीएम अशा २०१८ योजनेची अंमलबजावणी करावी.