सावंतवाडी : तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड – कोंडूरेतर्फे गावातील गरजू लाभार्थी महिलांना उज्वला गॅसची ११ कनेक्शन वितरित करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरजू लाभार्थी महिलांना माफक दरात गॅस कनेक्शन मिळावे, यासाठी उज्वला गॅस योजना सुरू करण्यात केली. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरेकडून गावातील ११ गरजू लाभार्थी महिलांना उपसरपंच हेमंत मराठे यांच्या सहकार्याने उज्वला गॅस कनेक्शन वितरित करण्यात आली आहेत. यापूर्वीही मराठे यांच्या सहकार्याने गावातील १५ महिलांना उज्वला गॅस कनेक्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला होता. या वितरण प्रसंगी सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे यांसह ग्रामस्थ व लाभार्थी कुटुंबीय उपस्थित होते.
Home ब्रेकिंग न्यूज मळेवाड – कोंडूरे ग्रामपंचायततर्फे गरजू लाभार्थी महिलांना उज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शनचे वितरण.!...





