सावंतवाडी : शहरातील भटवाडी येथील अश्वमेध बिल्डिंग कन्स्ट्रक्शनजवळ बंदिस्त गटार कामाचा शुभारंभ शिवसेना गटाचे सावंतवाडी शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांच्या हस्ते झाले.
मंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार स्थानिक निधीतून हे काम होत असून यासाठी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सावंतवाडी नगर परिषदेच्या माध्यमातून या कामाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेविका भारती मोरे, संजय पेडणेकर, दिपाली सावंत तसेच परशुराम चलवाडी, नीलिमा चलवाडी, प्रतीक बांदेकर, पूजा नाईक, दत्ता सावंत, हेलन डिसोजा, डॉमिनिक डिसोजा, बबन डिसोजा, बबलू डिसोजा, व्हिक्टर डिसोजा, आनंद शिंदे, आनंदी शिंदे, अनिता शिंदे, साधना मोरे, सुप्रिया गावडे, श्री. गिरगोल, मोनिका डिसोजा, जुली डिसोजा, सिद्धेश परब आदी उपस्थित होते
शहराचा सर्वांगीण विकास कर,ण्यासाठी नामदार दीपक केसरकर हे कटिबद्ध असून रस्ते वीज पाणी या सुविधा निर्माण करू असे आश्वासन शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी दिले. तर या भागाच्या विकासासाठी जनतेसोबत आम्ही आहोत. आमच्या सोबत जनतेने राहावे, असे आवाहन माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांनी केले. ठेकेदाराने कामाचा दर्जा राखावा, असे आवाहन दत्ता सावंत यांनी यावेळी केले.





