आंबा, काजू पिक विमा पोर्टल ५ डिसेंबरपर्यंत सुरु..!

138

सिधुदर्गनगरी : आंबा, काजू, संत्रा ही फळपीके व रब्बी ज्वारी साठी शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेण्यासाठी पिक विमा पोर्टल दिनांक ४ व ५ डिसेंबर २०२३ रोजी सुरू राहणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

कोकणातील आंबा, काजू, संत्रा , रब्बी ज्वारी या पिकांसाठी पिक विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ असा होता.
पिक विमा पोर्टल मधील काही समस्यांमुळे विमा योजनेत भाग घेऊ शकणारे इच्छुक शेतकरी योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले.
त्यांना भाग घेण्याची संधी देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने कृषी मंत्री धनंजय मुंडे , अमुस अनुप कुमार*. यांनी केलेल्या विनंतीला केंद्र शासनाने मान्यता देऊन आता दिनांक ४ व ५ डिसेंबर 2023 असे दोन अतिरिक्त (वाढीव ) दिवस पिक विमा पोर्टल या पिकांच्या सहभागासाठी सुरू राहणार आहे.तरी राज्यातील सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.