बांदा : ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशी गेली सहा वर्षे मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दिपावली निमित्त किल्ले स्पर्धा ( टाकाऊ व पर्यावरण पूरक साहित्य वापरून तयार केलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांची प्रतिकृती ) आयोजित करीत आहे. दिपावली किल्ले स्पर्धा २०२३ ला या वर्षी सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेत मानसराज महेश गवस याची किल्ले विसापूर ची प्रतिकृती प्रथम पारितोषिक ₹ १,०००/- व सन्मान चिन्हाची मानकरी ठरली तर द्वितीय पारितोषिक ₹ ७५०/- व सन्मान चिन्ह वेद मिलिंद कुडतरकर याच्या किल्ले पद्मदुर्ग प्रतिकृतीस मिळाले. तृतीय पारितोषिक विभागून दिव्या सुभाष देसाई ( सिंहगड) व ईशा गुरूप्रसाद गडेकर (प्रतापगड) यांना प्रत्येकी ₹ ५००/- व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.दर्पण आनंद देसाई व श्रृती हितेंद्र राणे यांच्या प्रतिकृतीस उत्तेजनार्थ ₹ ३००/- व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण प्रसाद राणे आणि स्वप्निल गडकरी यांनी केले. मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.





