सावंतवाडी : तालुक्यातील डेगवे मोयझरवाडी येथील श्रीमती काशीबाई बाबुराव देसाई (वय ९२) यांचे आज मंगळवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, पाच मुली, जावई, नातवंडे, दिर, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे.
सावंतवाडी येथील श्री. पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्रा. प्रतीक्षा सावंत, काजू बागायतदार मनोहर देसाई यांच्या त्या आई, तर पत्रकार विजय देसाई यांच्या त्या काकी होत. त्यांच्या निधनाने बांदा पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.





