मुंबई : शाहरुख खानचा २ नोव्हेंबरला वाढदिवस झाला. शाहरुख खान दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी त्याच्या वाढदिवसाला त्याच्या फॅन्सला भेटायला मन्नतबाहेर आला होता. शाहरुखला पाहायला त्याच्या फॅन्सनी प्रचंड गर्दी केली. शाहरुखचे यावर्षी पठाण, जवान हे दोन्ही सिनेमे सुपरहिट झाल्याने शाहरुखची एक झलक बघायला यंदा नेहमीपेक्षा जास्त गर्दी झाली. त्याचा परिणाम म्हणजे शाहरुखच्या वाढदिवशी आलेल्या तब्बल ३० फॅन्सचा मोबाईल चोरीला गेला. यावर आता बांद्रा पोलिसांनी कारवाई केलीय.
शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांचे मोबाईल चोरल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींकडून नऊ मोबाईल जप्त केले. याप्रकरणी शुभम जमनाप्रसाद, मोहम्मद अली आणि इम्रान अशा तिघांना वांद्रे पोलिसांनी अटक केली.
शाहरुखच्या वाढदिवसाला मोबाईल चोरीला गेल्याप्रकरणी बांद्रा पोलिस ठाण्यार FIR शाहरुखचे चाहते आले होते. तब्बल 30 चाहत्यांनी याप्रकरणी मुंबईतील बांद्रा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
किंग खानच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त त्याचं निवासस्थान म्हणजेच मन्नतबाहेर उभं असताना गुरुवारी रात्री त्यांचा फोन लुटला गेल्याचे त्यांना समजले. याप्रकरणी पोलिसांनी सुद्धा कडक कारवाई केलीय.





