पेन्शनधारकांचे धरणे आंदोलन…!

मुंबई : जनरल इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने निवृत्ती वेतनाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी, ३१ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे दिवसभर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

संघटनेचे चेअरमन काका सामंत, जनरल सेक्रेटरी उदयन बॅनर्जी आणि सतीश शेंडे यांनी संयुक्तिकरित्या प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या मिळणारी फॅमिली पेन्शन १५ टक्के असून ती अत्यंत तुटपुंजी आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर ती ३० टक्के इतकी असावी. जानेवारी २०२० मध्ये मुंबई आणि फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीच्या जंतर मंतर येथे केलेल्या आंदोलनानंतर अर्थ मंत्रालयाने ती ३० टक्के इतकी करण्यास तत्त्वतः मान्यता दिली होती.

त्यानंतर बँकेच्या पेन्शनधारकांची मागणी मान्य झाली मात्र, इन्शुरन्स पेन्शनधारकांचा प्रश्न प्रलंबितच आहे. ही मागणी मान्य व्हावी तसेच इन्शुरन्स पॉलिसीच्या टप्प्यातही सुधारणा व्हावी, यासाठी हे धरणे आंदोलन केले जाणार आहे, असे संघटनेने सांगितले.