कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, जोरदार घोषणांनी रोहा दणाणले.! ; रोह्यात टिकात्मक गीत गायनातून मराठा समाजाने राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले, दुसऱ्या दिवशी उपोषण सुरूच, वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा, तहसीलदार, पोलीस निरीक्षक भेटीला.

174

रोहा : शशिकांत मोरे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून बेमुदत उपोषणाला बसलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी रोहा तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने सलग ३ दिवस रोहा नगर पालिका चौकात साखळी उपोषण सुरु केले आहे.उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही मराठा समाजातील शेकडो तरुण,तरुणी,महिला व समाज बांधवांनी सरकार विरोधात टिकात्मक गीत व भजन गायन करून राज्यकर्ते व सर्व पक्षीय पुढऱ्यांचे लक्ष वेधले.या वेळी बहुजन वंचीत आघाडी या पक्ष संघटनेकडून लेखी पत्राद्वारे पाठींबा दर्शवीला.तर उपोषण शांततेत पार पाडावे त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तहसीलदार डॉ. किशोर देशमुख,नायब तहसीलदार राजेश थोरे, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी उपोषण ठिकाणी धावती भेट देत मराठा समाज बांधवांशी चर्चा केली.


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सरू आहे.समाजाला आरक्षण मिळावे तसेच जरांगे पाटील यांच्या समर्थनाथ रोहा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवार पासून नगरपालिका कार्यलया समोर तीन दिवस साखळी उपोषण सुरु केले आहे.आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही मराठा समाज बंधू आणि भगनींनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शवून झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.उपोषणस्थळी या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वर पाय……आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे….. कोण म्हणते देणार नाही,? घेतल्या शिवाय राहणार नाही….. तुमचं आमचं नातं काय,? जय जिजाऊ जय शिवराय……आमच्या मागण्या पूर्ण करा,नाहीतर खुर्च्या खाली करा…..अशा घोषणा देत उपोषणाकर्त्यांनी सर्व पक्षीय पुढऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि सबंध परिसर दणाणून सोडला.
या तीन दिवसीय उपोषणाला व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून वंचीत बहुजन आघाडी,सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान,कोकण शेतकरी व मजूर सामाजिक संस्था,दि अखिल भारतीय विश्व्कर्मा तसेच रोहा अष्टमी मुस्लिम समाज बांधव या सघटनांनी जाहीर पाठींबा दर्शवीला आहे.पाठिंबा दर्शविलेल्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे प्रदीप देशमुख,नितीन परब,महेश सरदार यांनी आभार व्यक्त केले.याठिकाणी तांबडी,घोसाळे भालगाव,चणेरा, विभागातील दिनकर बावकर,सचिन सावंत,किशोर सावंत,उदय शेलार,काशिनाथ सावंत तर महिलांमध्ये कांचन बावकर,राजेश्री येरम,सुजाता म्हांदलेकर,सुगंधा वाईकर,अनिता राणे,सुवर्ण सावंत, सुचिता सावंत,नंदा जाधव यासह मराठा समाज बांधव,भगिनीनी आज या विचार मंचावरून आपआपला रोष व्यक्त केला.
मराठा समाजाने केवळ योद्धाच नव्हे तर नेता म्हणून स्वीकारलेल्या मनोज जरांगे पाटलांनी पुकारलेल्या आंदोलनाची आग आता हळूहळू भडकत महराष्ट्रात सर्वत्र पसरू लागली आहे.आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन पेटू लागले आहे.या अनुषंगाने रोह्यात शांतता नांदावी, उपोषण लोकशाही मार्गाने व्हावे,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हूणन तहसीलदार डॉ. किशोर देशमुख,नायब तहसीलदार राजेश थोरे,पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी घटनास्थळी भेट देत मराठा समाज बांधवांशी चर्चा केली.यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख,नितीन परब,विनोद पाशीलकर,समीर शेडगे,महेश सरदार,राजेश काफरे,अजित मोरे, निलेश शिर्के,अशोक मोरे,अंनत देशमुख,अमोल देशमुख,प्रशांत देशमुख,शशिकांत मोरे,सूर्यकांत मोरे,परशुराम चव्हाण,किरण मोरे,संदीप सावंत, यशवंत अप्पा शेडगे,मामा सुर्वे आदी मराठा समाज बांधव व भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
राज्यभरात विशेषतः मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलनाला गालबोट लागले आहे.विविध पक्षीय लोकप्रतिनिधी यांच्या घरांची तोडफोड तर वाहने आडविली जात आहेत. काहिठिकाणी जाळपोळ करून रस्त्यावर टायर जाळून जमावा कडून आंदोलन करण्यात येत आहेत.त्यातच तीन दिवसापूर्वी ठाण्यात खा. सुनील तटकरे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार घडला आहे.म्हणून सुरक्षेतेच्या दृष्टीने खा. सुनील तटकरे,मंत्री अदिती तटकरे,आम.अनिकेत तटकरे व त्यांच्या कुटूंबियांना पोलीस बंदोबस्त देण्यात आले आहे.सुतारवाडी येथील गीताबाग या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.