बांदा : बांदा येथील काणेकर कुटुंबियांतर्फे कोजागरी पौणिर्मेला श्री साईबाबा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातारणात साजरा झाला . त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या सोहऴ्यानिमित्त विविध नामवंत संगीत कलाकारांच्या विविधांगी संगीत सादरीकरणाचा लाभ संगित रसिकांनी घेतला.
सकाळी श्री साईबाबांची महापूजा व आरती आरती होऊऩ महाप्रसादास आरंभ झाला. सायंकाळी ४ वाजल्यापासून तीर्थप्रसाद, रात्री ९ वा. पहिल्या सत्रात गोव्यातील भजनी गायक पांडुरंग राऊळ, विठ्ठल शिरोडकर, प्रल्हाद गांवस, मिलींद परब व मोहन पेडणेकर यांचा पारंपरिक भजन कार्यक्रम झाला. दुसर्या सत्रात पुणे येथील सौरभ काडगांवकर यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. त्यांना तुळशीदास नावेलकर तबला व राया कोरगावकर हार्मोनियम साथसंगत केली.त्यानंतर तिसर्या सत्रात गोवा येथील सम्राज्ञी शेलार यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. त्यांना बुद्धेश तळकर यांनी तबला तर सुनाद कोरगावकर यांनी हार्मोनियम साथसंगत केली.भाविकांनी तसेच संगित रसिकांनी या सोहऴ्याचा लाभ घेतला.





