बांदा येथे 108 सूर्यनमस्कार शिबीर…!

बांदा : पतंजली योग समिती बांदा आणि पतंजली योगसमिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा च्या भव्य पटांगणावर आज 108 सूर्यनमस्कार शिबिरचे आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय सुर्यनमस्कार दिनाचे अर्थात रथसप्तमी चे औचित्य साधून सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उद्घाटक म्हणून बांदा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्यामराव काळे साहेब आणि अध्यक्ष म्हणून शिक्षण तथा आरोग्य सभापती प्रमोदजी कामत लाभले.

त्यावेळी पतंजली योग समिती सिंधुदुर्ग चे सहजिल्हा प्रभारी शेखर बांदेकर, बांदा ग्रामपंचायत सरपंच प्रियांका नाईक, व्ही एन नाबर चे मुख्याध्यापक सौ मनाली देसाई, भारत स्वाभिमान जिल्हा प्रभारी महेश भाट, किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी सुभाष गोवेकर, लक्ष्मण पावसकर, प्रियांका हरमलकर, दत्तात्रय निखार्गे, उत्तम देसाई, प्रेमानंद देसाई, अभिलाष देसाई आदी उपस्थित होते.

दिप प्रज्वलनाने उद्घाटन झाल्यानंतर 108 सूर्यनमस्कार चे शिबीर शेखरजी बांदेकर यांनी घेतले. सदर शिबिरास पतंजली योगसमिती बांदा आणि पतंजली योगसमिती डेगवे चे सर्व साधक उपस्थित होते. तसेच खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, व्ही एन नाबर स्कूल आणि बांदा नं 1 च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल च्या व्यवस्थापकांनी सदर शिबिरासाठी लागणारे स्टेज, साउंड सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली. योगाभ्यास करणे ही काळाची गरज आहे असे प्रमोदजी कामत यांनी सांगितले.