तरुणाईसाठी शाश्वत रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू! ; वेंगुर्लेत विशाल परब यांचे प्रतिपादन.

116

वेंगुर्ले : वेंगुर्लेबद्दल विशेष प्रेम असून वेंगुर्लेतील तरुणांसाठी पर्यटनातून शाश्वत रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच वाढदिवसाव्यतिरिक्त वर्षभर इतर वेळात सुद्धा जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत असे प्रतिपादन विशाल परब यांनी वेंगुर्ले येथे केले.


भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे ‘भव्य दिव्य सिंधु युवा विशालोत्सव शोध नाविन्याचा’ व “राज्यस्तरीय विशाल दांडिया स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी दांडिया स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी विशाल परब बोलत होते. या विशाल दांडिया स्पर्धेत श्री देवी नवदुर्गा दांडिया ग्रुप आयी दोडामार्ग ने प्रथम क्रमांक, त्रिमूर्ती दांडिया ग्रुप दाभोसवाडा वेंगुर्ले ने द्वितीय क्रमांक व उत्कर्ष दांडिया ग्रुप दाभोसवाडा वेंगुर्ले ने तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना अनुक्रमे 11,555 रुपये ,7,555 रुपये व 5,555 रुपये. तसेच प्रत्येकी चषक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. या दांडिया ग्रुप मधील उत्कृष्ट बेस्ट परफॉर्मन्स साठी वैष्णवी पडवळ ,दिक्षी बापर्डेकर, राजाराम कांबळी , आदित्य गोडे ,विनोद बेबेकर ,प्रतीक गवंडी ,अनिल सामंत ,सिद्धांत शिरगावकर व अंकुश दळवी इत्यादी 9 जणांना वैयक्तिक प्रत्येकी 1 हजार रुपये मानधन , प्रशस्तीपत्रक व चषक देऊन गौरविण्यात आले .या स्पर्धेत श्री देव ब्राह्मण दांडिया ग्रुप दाभोली , श्री देवी नवदुर्गा दांडिया ग्रुप आयी दोडामार्ग ,श्री देव तांबळेश्वर – भगवती दांडिया ग्रुप गाडीअड्डा ,सिद्धिविनायक दांडिया ग्रुप नांदगाव ,उत्कर्ष दांडिया ग्रुप दाभोसवाडा ,स्वयंभू दांडिया ग्रुप मठ ,त्रिमूर्ती दांडिया ग्रुप दाभोसवाडा ,श्री कुलदेवता दांडिया ग्रुप आवेरा , श्री देव चाळा दांडिया ग्रुप होडावडा इत्यादी दांडिया ग्रुप सहभागी झाले होते .या स्पर्धेचे परीक्षण कोल्हापूर येथील चित्रपट , मालिका नृत्य , नाट्य व कला दिग्दर्शक सागर बगाडे यांनी केले. स्पर्धेच्या सुरुवातीस
सिंधुरत्न ढोलपथक वेतोरे ने उत्कृष्ट सादरीकरण करीत मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी वेदिका परब ,प्रभाकर परब , भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य
शरद चव्हाण ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत तांडेल ,जयंत मोंडकर साईप्रसाद नाईक ,
भाजपा तालुका सरचिटणीस बाबली वायगणकर , शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण , तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे ,
दादा केळुसकर , कुडाळ
माजी नगराध्यक्ष विनायक राणे , माजी नगरसेवक सुनील बांदेकर ,कुडाळ भाजपा तालुकाध्यक्ष दादा साईल , जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये , बंड्या सावंत ,पप्या तवटे , प्रसाद पाटकर , समीर नाईक ,मारुती दोडनशट्टी ,भूषण सारंग ,प्रशांत प्रभूखानोलकर ,भूषण आंगचेकर ,युवा मोर्चाचे हितेश धुरी , हेमंत गावडे ,शरद मेस्त्री , वेतोरे पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील , अणसूर सरपंच सत्यविजय गावडे , प्रीतम सावंत ,माजी नगरसेविका साक्षी पेडणेकर ,रसिका मठकर , मनवेल फर्नांडिस , तालुका चिटणीस समीर कुडाळकर , प्रणव वायंगणकर , वेताळ प्रतिष्ठान तुळस चे प्रा. सचिन परुळेकर , जगन्नाथ राणे , आदिंसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्पर्धेच्या सुरुवातीस परीक्षक सागर बगाडे यांचा वसंत तांडेल व प्रसन्ना देसाई यांनी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. विशाल परब यांचा भाजपच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी भव्यदिव्य अशा दांडिया स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्रसन्ना देसाई , वसंत तांडेल , जयंत मोंडकर यांचे विशेष कौतुक केले
यावेळी तुळस येथील सर्पमित्र व जिल्ह्यातील रक्तदाता महेश राऊळ यांचा भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंत तांडेल ,सूत्रसंचालन बादल चौधरी व उमेश नेमळेकर यांनी , प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी आभार मानले. वसंत तांडेल व जयंत मोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले.