नवी दिल्ली : समलैंगिक विवाहाच्या कायदेशीर मान्यतेवर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. पण राज्यघटनेतील विशेष विवाह कायद्यानुसार अशा विवाहाला मान्यता नाही. पण यातही एक पळवाट असल्याचं आता सिद्ध झालं आहे. कारण ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या लग्नाला एकाच अटीवर कायदेशीर मान्यता मिळू शकते, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे.
तर ‘हा’ विवाह कायदेशीर ठरतो –
सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासह इतर चार न्यायाधीशांच्या अर्थात पाच सदस्यीय खंडपीठासमोर समलैंगिक विवाहसंबंधी कायद्यावर सुनावणी सुरु आहे. यामध्ये CJI चंद्रचूड यांनी एक महत्वाची टिप्पणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, “एखाद्या व्यक्तीचं लिंग आणि लैंगिकता या दोन भिन्न गोष्टी असू शकतात. लग्नाबद्दलचे कायदे हे Heteroexuality डोक्यात ठेवून केलेले आहेत. ट्रान्समॅन एका महिलेशी लग्न करू शकतो आणि ट्रान्सवुमन एका पुरुषाशी लग्न करु शकते. याला कायदेशीर मान्यता आहे. म्हणजेच ट्रान्सजेंडर व्यक्ती जर विषमलिंगी व्यक्तीसोबत लग्न करत असेल तर त्याला मान्यता दिली जाऊ शकते. कारण या विवाहात एक महिला असते आणि एक पुरुष असतो”



