मिलाग्रीसच्या आस्था लोंढेचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले कौतुक.!

120
  1. सावंतवाडी :शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित शालेय तालुका स्तरीय कॅरम स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलची विद्यार्थ्यांनी कु. आस्था अभिमन्यू लोंढे हीने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला म्हणून शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी तीचे कौतुक केले. यावेळी मालवणी अभिनेता दिगंबर नाईक उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी उपस्थित मालवणी अभिनेते दिगंबर नाईक यांनी देखील आस्था हिचे कौतुक करून आपल्या कोकणातील बालकांमध्ये प्रचंड गुणवत्ता असल्याचे सांगत आस्थाने आपल्या या गुणवत्तेला अजून पुढे न्यावे, अशी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.