पत्रकारितेतलं नवं पर्व | ‘महाराष्ट्र माझा’ न्यूज चॅनेलचा दमदार शुभारंभ 

437
सावंतवाडी : महाराष्ट्राच्या मीडिया क्षेत्रात महाराष्ट्र माझा हे न्यूज चॅनेल आज दिनांक 30 डिसेंबरला 2022 रोजी महाराष्ट्राच्या सेवेत येत आहे. आज सावंतवाडी येथील प्रधान कार्यालयाचे उद्घाटन सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सावंतवाडीतील प्रधान कार्यालयाचं उदघाटन प्रांताधिकारी डॉ. प्रशांत पानवेकर यांच्याहस्ते करण्यात आलं. तर स्टुडिओचं अनावरण ज्येष्ठ पत्रकार उमेश तोरसकर यांच्याहस्ते करण्यात आलं. यावेळी पत्रकार अमोल टेमकर, पत्रकार प्रवीण मांजरेकर, मुख्यमंत्र्यांचे माजी स्वीय सहाय्यक पाटणकर, प्रा. राजाराम परब, मळेवाड सरपंच पार्सेकर, वंचित बहुजनचे महेश परुळेकर आदी उपस्थित होते.