सावंतवाडी : शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोलच्या विद्यार्थ्यांनी ‘वर्ल्ड फार्मासिस्ट दिना’निमित्त सावंतवाडी शहरातील गांधी चौक व बाजारपेठेत पथनाट्य सादर करून जनजागृती केली.


या पथनाट्यातून फार्मासिस्टचे महत्व, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रथमोपचार, औषध निर्मीत्यांचे महत्त्व लोकांसमोर पथनाट्यद्वारे सादर करून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. या पथनाट्यात डी. फार्म, बी.फार्म व एम.फार्मच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच सहाय्यक प्राध्यापिका दिप्ती फडते, वर्षा राणे, प्रणया चोडणकर यांनी सहाय्य करून विद्यार्थ्यांना मदत केली.







