सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षा निमित्त आरोंदा ग्रामोन्नती सभागृहात आयोजित पाककला स्पर्धेचा सरपंच सुभाष नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंचसदस्य गोवींद(आबा) केरकर सीध्येश नाईक, शील्पा नाईक व आरोंदा सोसायटीचे सचीव रघुनाथ (बबन) नाईक उपस्थित होते.
यशवंत गव्हाणे (कृशिअधिकरी)अक्षय चव्हाण मीनल परब यांनी पिकांचे वीमा योजना, कीसान क्रेडीड कार्ड, प्रधान मंत्री सूक्ष्म प्रक्रिया योजना याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषि सहाय्यक प्रीया पवार यांनि केले.





