‘एक तारीख एक तास श्रमदान’ उपक्रमांतर्गत श्रमदान, स्वच्छता अन् मार्गदर्शन.! ; माध्यमिक विद्यामंदिर साळशीचे आयोजन.

56

देवगड : ‘एक तारीख एक तास श्रमदान’ या उपक्रमांतर्गत साळशी प्रशालेत सर्वप्रथम विद्यार्थी व शिक्षक यांनी ग्रा.पं.साळशी, साळशी हायस्कूल व केंद्र शाळा यांच्या संयुक्तपणे आयोजित साळशी गावातील श्रमदानात उत्साहाने सहभाग घेतला. मुख्य कार्यक्रमात सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. ‘श्रमदान व स्वच्छता’ या विषयावर हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक श्री. साटम सर व केंद्र शाळेचे श्री. मराठे सर यांनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष  म्हणून साळशी सरपंच वैशाली सुतार यांनीही विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास साळशीचे माजी सरपंच अनिल पोकळे, विशाखा साळसकर, किशोर साळसकर, सर्व शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, अनेक प्रतिष्ठित नागरिक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

साळशी हायस्कूलमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमांत प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यानंतर सहाय्यक शिक्षक श्री. मराठे सर व श्री. भरणकर सरांनी स्वच्छतेविषयी मार्गदर्शन या विषयावर आपले विचार व्यक्त केले.
यानंतर मुख्य व्याख्यानात ‘श्रमदान व स्वच्छता’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे सर यांनी हा उपक्रम राबविण्याचे कारण, मानवी जीवनात स्वच्छतेची गरज, श्रमदान, पर्यावरण प्रदूषण व त्याची कारणे या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले. याविषयी आजपासून सर्व विद्यार्थ्यांनी करावयाचे उपाय याविषयी अनेक उदाहरणे देत त्यांनी आपले विचार व्यक्त केले.