अभिमानास्पद..! – ‘महाराष्ट्र माझा’च्या मंगल कामत यांची शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रार निवारण समिती सदस्यपदी स्तुत्य निवड.

30

सावंतवाडी : बांदा तालुक्यातील कास येथील रहिवासी तसेच सावंतवाडी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार व ‘महाराष्ट्र माझा’च्या सीनियर करस्पॉन्डंट मंगल शांताराम कामत यांची महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या समितीच्या अशासकीय सदस्य पदी निवड झाली आहे.

तसे निवडीचे पत्र त्यांना राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्गच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिले आहे. मंगल कामत यांची यापूर्वीही महिलांच्या तक्रार निवारण समिती सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांच्या या स्तुत्य निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.