सावंतवाडी : शहरातील मोती तलावात आज अज्ञात सायंकाळी एका अज्ञात युवकाने उडी मारली आहे. ही घटना आज रात्री येथील पालिका कार्यालयासमोर घडली आहे. सदर तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. संबंधित तरुण नेमका कोण? याबाबत मात्र उशिरापर्यंत माहिती मिळाली नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून घटनेबाबत शोध कार्य सुरू होते.





