रोहित पवारांना मोठा दिलासा ! ; ‘बारामती ॲग्रो’ प्लांटवरील बंदीची कारवाई टळली.

55

बारामती : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 6 ऑक्टोबर पर्यंत कारवाई न करण्याचे आदेश कोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला दिले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रोहित पवार यांना 72 तासांचा वेळ दिला होता, त्यामुळे कोर्टाच्या या आदेशांमुळे रोहित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. रोहित पवार यांच्या बारामतीतील बारामती ॲग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने कारवाई केली होती. या कारवाईअंतर्गत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना रात्री 2 वाजता नोटीस देत 72 तासांत प्लांट बंद करण्याची सूचना देण्यात आली होती. दरम्यान बारामती ॲग्रोबाबत आता सहा ऑक्टोबरला पुढील सुनावणी पार पडणार आहे.